रचना क्र. 462
अवघे जन भेदे भरे
श्री पेठेकाका
अवघे जन भेदे भरे ।
जो तो म्हणे माझे खरे ॥१॥
सोने देता नारायण ।
जग माती मागे जाण ॥२॥
करिता येते भले तरी ।
दुःखे जीव जीवे मारी ॥३॥
एक गुरूसी ये करुणा ।
जिवा जाग देतो जाणा ।४॥
करी भेदाचा निरास ।
हीच कृपा त्याची खास ॥५॥
दीन म्हणे ऐसा गुरू ।
भेटो सर्वा सौख्यतारू ॥६॥
