रचना क्र. 464
दे दर्शन ईश्वरा
श्री नंदन
दे दर्शन ईश्वरा, ईश्वरा ॥धृ॥
अपराधांच्या राशी असुनि,
घे पदरी पामरा ॥१॥
दुर्बुद्धीने व्याप वाढला,
बुडलो भवसागरा ॥२॥
गुंतत हे मन नको त्या रसी,
दे भान नश्वरा ॥३॥
चुकुनी झाली भेट तुझी ही,
ठाव दे गुरुवरा ॥४॥
चरणी राहो नामी रंगो,
परत नको भोवरा ॥५॥
भक्तगणूला मुक्ती लाभो,
तू आम्हा सोयरा ॥६॥
