रचना क्र. 476
श्री श्रीकृष्णसरस्वतींची आरती
श्री पेठेकाका
जय श्रीकृष्णसरस्वति दत्ता, कोल्हापुरवासी ।
शिर्के सदनी वास करोनी, सर्वां उद्धरिसी ॥धृ॥
अश्रद्धा, संदेह नावडे,
जातपात, मीपणा नावडे ।
शिक्षा, भिक्षा, खुबीने धडे,
सुधारण्या देशी ॥१॥
कधी कृपेचा विसर न व्हावा,
अभेदभावे देव भजावा ।
नाम घेत गुरु नित्य स्मरावा,
बोधिशि दीनासी ॥२॥
