रचना क्र. 477
सूर्यनारायणाची आरती
श्री पेठेकाका
जय जय करु आरती । हे सूर्यनारायणा ॥धृ॥
प्राचीप्रतीचीहि तू, अधऊर्ध्व हे सर्व तू ॥
स्थितिशील गतिशील तू, हे नित्यनारायणा ॥१॥
ती दीप्तितमकाल तू, ग्रहतारकाचंद्र तू ॥
जलभूमि हे वायु तू, हे अग्निनारायणा ॥२॥
हे जन्म हे मृत्यु तू, अखिलांस जीवन तू ॥
दीनांस गुरु, देव तू, हे आत्मनारायणा ॥३॥
