रचना क्र. 479
श्री बीडकर महाराजांची आरती
श्री पेठेकाका
गुरुवर बीडकर, जयजय रामानंद धन्य ।
स्वामिसमर्थाविना जयांसी, दैवत ना अन्य ॥धृ॥
श्रम निग्रह अभ्यास करावा ।
उदंड यश संसारी मिळवा ।
फोलपणा मग जाणुनि घ्यावा ।
प्रपंच टाकावा, बोधिशि, प्रपंच टाकावा ॥१॥
भक्तीपुढती काहि न जगति ।
सद्गुरुकृपया स्वानंदस्थिति ।
नरजन्मी ही अंतिम प्राप्ती ।
ईश्वर मिळवावा, बोधिशि, ईश्वर मिळवावा ॥२॥
