रचना क्र. 501
ज्याची धरावी संगती
श्री पेठेकाका
ज्याची धरावी संगती ।
तैसी होते वृत्ती स्थिती ॥ १ ॥
विषयी अहंकारी जन ।
तैसे सहज बनते मन ॥ २ ॥
नम्र उदार आणि धीर ।
संगे करिते मन तयार ॥ ३ ॥
धरी हाती माळ मनुज ।
ओठी नाम येते सहज ॥ ४ ॥
धरितां संतांची संगती ।
दीनभक्तां विठ्ठलप्राप्ती ॥ ५ ॥
