रचना क्र. 507
पाकसिद्धी अमुच्यासाठी
श्री पेठेकाका
पाकसिद्धी अमुच्यासाठी |
काय जाई देवा पोटी || १ ||
शब्दे उदंड निंदास्तुती |
चार शब्दांची आरती || २ ||
काही दान केले जरी |
काय देव घेई करी || ३ ||
सर्वांठायी देव पाही |
देव त्याची सेवा घेई || ४ ||
नामस्मरणे जीवन भरले |
सेवे देव आनंदले || ५ ||
दीन म्हणे मर्म जाणी |
निर्गुण भक्त राही सगुणी || ६ ||
