रचना क्र. 508
ज्यासी गुरुभेटीची ओढ
श्री पेठेकाका
ज्यासी गुरुभेटीची ओढ ।
त्यासी अन्न नलगे गोड ॥ १ ॥
ज्यासी प्रिय झालासे देव ।
विटतो प्रपंचाला जीव ॥ २ ॥
गोड कथाकीर्तन वाटे ।
प्रेम, तळमळ हृदयी दाटे ॥ ३ ॥
जाता येता अनुसंधान ।
नाम कंठी प्राण धरून ॥ ४ ॥
देव होतसे आतुर ।
शिष्या भेटण्या गुरुवर ॥ ५ ॥
दीन म्हणे तो भाग्याचा ।
लाभ घडो सत्संगतिचा ॥ ६ ॥
