रचना क्र. 28
श्री गुरुदेवांची आरती
श्री पेठेकाका · null
null
नेमकुळीच्या देवा, साधकप्राणविसावा ।
जय जय, आरती श्री गुरुदेवा ॥ धृ ॥
निंबाळक्षेत्री शुद्ध झरा ।
निंबरगीहुनि येई घरा ।
प्रसन्न केले उमदीश्वरा ।
दिव्यनाममय ठेवा ॥ १ ॥
परमार्थाच्या कीर्तिध्वजा ।
झळकविले जगि ‘निज’ तेजा ।
दीन वांछिती चरणरजा ।
कृपेसाठी करू धावा ॥ २ ॥
