रचना क्र. 29
प्रेमनिधी संत सीतामाईंची आरती
श्री पेठेकाका · null
null
सीतामाई आई गाऊ आरती ।
धन्य तुमची भक्ती वाटे या जगती ॥धृ॥
माहेर भक्तीचे धन्य कुळ वारे ।
बाळपण प्रेम-कष्टांचे सारे ।
पतिदेव श्रीराम कुळ गणोरे ।
त्यांच्या रूपे देव झाले सोयरे ॥१॥
बाबांसंगे देशभक्ती आचरिली ।
कष्टांची कावड प्रेमे वाहिली ।
बाबांना प्रेरणा देवाची झाली ।
पातिव्रत्ये साथ त्यातही दिधली ॥२॥
साक्षात्कारे धन्य बाबा जाहले ।
अध्यात्माचे धन आईंना दिधले ।
भक्तीव्रत तुम्ही पुढती चालविले ।
भक्तांना आदर्श जीवन झाले ॥३॥
आदर्शाची कीर्ती लेकरे गाती ।
कर्तव्य, नामाची प्रेरणा घेती ।
पंढरी भुकूम गाई आरती ।
तरण्या दीनभक्त चरणी लागती ॥४॥
