रचना क्र. 7
प्रगतीचे खरे गमक
श्री पेठे काका
(प्रगतीसाठी प्रत्येकाचे प्रयत्न चालले
असले, ती घडत असल्याचे वाटतही
असले तरी खरी प्रगती कशात आहे
याचे आकलन व स्मरण रोज
होण्यासाठी ही प्रार्थना सकाळी किंवा
रात्री म्हटल्यास उपयोगी होऊ शकेल.)
केल्या क्रिया जरि किती सात्त्वीक त्याही ।
मी अंतरात असतो तसलाच राही ॥
कळले खरे गमक हे वृृत्त्यंतरात ।
माझे मला बदलणे मम अंतरात ॥
-- श्रीराम --
