रचना क्र. 8
संकल्पाची प्रार्थना
श्री पेठे काका · null
null
विघ्नहरा स्मरुनीया,
सात्त्विक संकल्प जो मनी धरिला ।
बुद्धी द्या टिकण्याला,
शक्ती द्या तो तडीस नेण्याला ॥
नामाने उजळावी,
वृत्ती-कर्मे सदैव सर्वांची ।
देवा छाया राहो,
आम्हांवरती अशीच संतांची ॥
-- श्रीराम --
