रचना क्र. 523
गुरुराया वेगी जाई तू शरण
श्री कृष्णदास महाराज · null
null
गुरुराया वेगीं जाई तूं शरण ।
कल्पना अभिमान पायी ठेवीं ।।
पायीं ठेवीं देहा अचेतन जडा ।
घेऊं नको मूढा जन्म कोटी ।।
जन्म कोटी घडे त्रिगुणा कारणें ।
साधूचे संगानें गुण आटे ।।
गुण आटे तेणें सर्व भ्रम फीटे ।
अंतरीं प्रगटे आत्माराम ।।
आत्माराम झाला कल्पनाभिमान ।
सगुण निर्गुण गुरु माझा ।।
गुरु माझा राजाराम दासस्वामी ।
नेला मोक्षधामीं कृष्णदास ।।
