रचना क्र. 4
श्री माणिकप्रभू
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री माणिकप्रभूंस ।
श्री दत्तप्रभू वाली जयांस ।
उपासना, निष्ठेने प्रभुपदांस ।
गाठले आपण साक्षात ॥१७॥
भक्तांस सदैव रक्षिता ।
दुष्टांसि शासन करिता ।
संकटी धावून येता ।
आजही आर्तांच्या ॥१८॥
दानधर्म अपार केला ।
भजनास निर्मिली पद्यमाला ।
भक्तकार्यकल्पद्रुमाला ।
काही अशक्य असेना ॥१९॥
