रचना क्र. 5
श्री स्वामी समर्थ, अक्कलकोट
श्री पेठेकाका · null
null
श्री अक्कलकोट स्वामींस नमन ।
श्री दत्त, नृसिंहसरस्वती आपण।
कर्दळीवनी नृसिंहभान होऊन ।
आजानुबाहू प्रगटला ॥२०॥
सिद्धी, भूतभविष्यवर्तमान ।
स्वामी समर्थांपुढे हात जोडून ।
उभे असताही निरिच्छ राहून ।
कितीक जना उद्धरिले ॥२१॥
अतर्क्य भाषा, परीक्षा, सत्ता ।
परि शरणागतासी अभय देता ।
रावरंका लीला दाविता ।
प्रचीती आजही येतसे ॥२२॥
