रचना क्र. 12
श्री टेंब्ये स्वामी
श्री पेठेकाका
श्री वासुदेवानंद सरस्वतींस नमन ।
त्रिखंड कीर्ती टेंब्येस्वामी म्हणून ।
असंख्य शास्त्र-विद्यांचे अध्ययन ।
उदंड शिष्य उद्धरिले ॥४१॥
माणगाव पूर्वजीवने धन्य ।
चातुर्मास्यांनी अनेक ग्रामे पावन ।
गरुडेश्वरी समाधी घेऊन ।
तीर्थक्षेत्र तया केले ॥४२॥
साक्षात देवांशी संवाद साधिला ।
आज्ञेने कठोर तप जगला ।
विपुल ग्रंथ, मंत्र प्रसाद दिधला ।
आम्हा साधकांना उद्धरावया॥४३॥
