रचना क्र. 15
श्री अरविंद
श्री पेठेकाका
श्री अरविंदांसी नमन ।
अद्भुत आपुले दर्शन ।
उपदेशिले दिव्य जीवन ।
आजीवन जगूनिया ॥५०॥
उच्च आंग्लविद्याविभूषित ।
क्रांतिकारकांचे दैवत ।
त्यागाने आयुष्य समस्त ।
तळपते आपुले ॥५१॥
सावित्रीसम महाकाव्य ।
असंख्य ग्रंथ पाथेय दिव्य ।
माताजीकृपे आश्रम भव्य ।
आम्हा प्रेरणा देतसे ॥५२॥
