रचना क्र. 16
श्री बाबामहाराज सहस्रबुद्धे
श्री पेठेकाका
श्री बाबा महाराजांसि नमन ।
नमनभक्तीसही नमन ।
आत्मरूपी अखंड ध्यान ।
जपले आपण ॥५३॥
लौकिक अभियंते झाला ।
वरिष्ठांसि आदरपात्र जाहला ।
सद्गुरूंसी आवडते झाला ।
साधननिष्ठेने ॥५४॥
पिसेपणे आत्मानुभव झाकला ।
देता खूण ज्याची त्याला ।
बोट धरुनी आम्हाला ।
देवमार्गी न्यावे ॥५५॥
