रचना क्र. 17
श्री जे. कृष्णमूर्ती
श्री पेठेकाका · null
null
श्री जे. कृष्णमूर्तींस नमन ।
भाव असता नमन प्रयोजन ।
सात्त्विक क्रियांतही सावधान ।
नित्य केले आम्हा ॥५६॥
आपुले दु:ख बंध जाणावे ।
स्वत:च स्वहित शोधावे, साधावे ।
मुक्त स्वत:स करावे ।
तेच साह्य इतरांस ॥५७॥
जेथे प्रश्न तेथे उत्तर ।
नसे इतर कुणी जबाबदार ।
प्रकाश टाकिला जो अवघ्यावर।
उपयुक्त असे आम्हांस॥५८॥
