रचना क्र. 25
स्वामी स्वरूपानंद, पावस
श्री पेठेकाका
नमन श्री स्वामी स्वरूपानंदांस ।
त्यागी, समाजसेवक, देशभक्तास ।
शांती, सद्गुरुनिष्ठा, साधनास ।
नमन कृतार्थतेस आपुल्या ॥८०॥
उत्कृष्ट बुद्धिमत्ता, अंतर्मुखता ।
आजाराच्या करुनी निमित्ता ।
प्रपंचादि कार्यांतून वळविता ।
झाला भगवंत कृपाळू ॥८१॥
प्रकृती क्षीण अकाली ।
सोऽहम् ध्यानी उपयोगा आली ।
जीवन्मुक्ती, जगदोद्धार साधून गेली ।
स्मरण राहो आम्हास ॥८२॥
