रचना क्र. 26
पूज्य कलावती आई
श्री पेठेकाका
श्री कलावती आईंस नमन ।
नमिला हरिहर तसा गोपाळकृष्ण ।
सफळ केले सिद्धारूढस्वामींचे शिष्यपण ।
खडतर साधन करुनी ॥८३॥
सोसले, पारखिले प्रपंची जन ।
न देता कोणासि दूषण ।
हरिनाम कीर्तन साधन ।
प्रतिकूलतेत टिकविले ॥८४॥
बालोपासना, भजनप्रेम ।
रुजविले आबालवृद्धांत नाम ।
आपुल्या हरिमंदिरीचे प्रेम ।
आजही लाभे घरोघरी ॥८५॥
