रचना क्र. 30
श्री विनोबाजी
श्री पेठेकाका
नमन श्री विनोबांस ।
अलौकिक प्रज्ञापुरुषास ।
अविश्रांत लोकसेवेस ।
नमन आपुल्या ॥९५॥
तसे नमन ब्रह्माचरणास ।
असंख्य भाषाविद्याकोविदास ।
अवघ्या धर्मांचा अभ्यास ।
अपूर्व गाढा आपुला ॥९६॥
गीताई असो वा भूदान ।
तेथे प्रज्ञा हृदय मीलन ।
तपश्चर्येचे आजन्म वळण ।
आम्हा साधकांना मिळो ॥९७॥
