रचना क्र. 31
श्री नाना महाराज, तराणेकर
श्री पेठेकाका
नमन श्री नाना महाराजांस ।
बालपणी घेतले अनुग्रहास ।
टेंबे स्वामींच्या कृपेस ।
पात्र आपण झाला ॥९८॥
तराणे ग्राम धन्य केले ।
कठोर तप आचरले ।
अनेक शास्त्रांचे मिळविले ।
प्रभुत्व आपण ॥९९॥
परी शिष्यांसाठी प्रेममूर्ती ।
आपण सांभाळिता जगती ।
साधनेस आम्हा गती ।
कृपा करून द्यावी ॥१००॥
