रचना क्र. 34
श्री तुकामाई, येहळेगाव
श्री पेठेकाका · null
null
नमन श्री परात्पर गुरुमाय ।
ब्रह्मज्ञानी श्री तुकामाय ।
उग्र परि प्रेमळ उपाय ।
भवरोगावरचा ॥१०७॥
दत्तकृपेचे अंशावतार ।
योग, वैराग्य, भक्ती साकार ।
चिन्मयानंदांचे शिष्य थोर ।
येहळेगाव तीर्थ केले ॥१०८॥
विठ्ठलभक्ती, कांदाभाकर ।
अभक्तांना शिव्या, भक्तांना प्रेमपाखर ।
ब्रह्मचैतन्य घडवुनी उद्धार।
अगणित जिवांचा साधला ॥१०९॥
