रचना क्र. 35
श्री महाराज, गोंदवले
श्री पेठेकाका
आणि दयासिंधु गुरुमाउली ।
ब्रह्मचैतन्यरूपे साकारली ।
गोंदवल्यास मूर्त झाली ।
नमन त्रिवार तियेला ॥११०॥
अनुसंधान अखंड राखावे ।
नामस्मरणे जीवन भरावे ।
भगवंतस्मरणात करावे ।
कर्तव्य आपुले ॥१११॥
अतिथी गरजूंस अन्नदान ।
वृत्त्यंतरी दक्ष राहून ।
निर्व्याज प्रेम आपल्यापासून ।
शिकावेसे वाटे ॥११२॥
