रचना क्र. 39
माझे चित्त तुझे पायी
श्री तुकोबा · null
null
माझे चित्त तुझे पायी ।
राही ऐसे करी काही ।
धरोनिया बाही ।
भव तारी दातारा ॥१॥
चतुरा तू शिरोमणी ।
गुण लावण्याची खाणी ।
मुकुट सकळा मणी ।
धन्य तूचि विठोबा ॥२॥
करी या तिमिराचा नाश ।
उदय होऊनि प्रकाश ।
तोडी आशा पाश ।
करी वास हृदयी ॥३॥
पाहे गुंतलो नेणता ।
माझी असो तुम्हा चिंता ।
तुका ठेवी माथा ।
पायी आता राखावे ॥४॥
