रचना क्र. 40
राघवाचे हेचि ध्यान
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
राघवाचे हेचि ध्यान ।
चरणी लागो माझे मन ॥१॥
रूप ध्यानी धरू ।
रामालागी हाका मारू ॥२॥
माझे जीवीचे जीवन ।
राम जगत्रय जीवन ॥३॥
रामापायी पडो मिठी ।
नाम राहो सदा कंठी ॥४॥
दीनदासाचे भजन ।
अर्पियेले तनमनधन ॥५॥
