रचना क्र. 44
आता तरी पुढे हाचि उपदेश
श्री तुकोबा · null
null
आता तरी पुढे हाचि उपदेश ।
नका करू नाश आयुष्याचा ॥ धृ ॥
सकळांच्या पाया माझे दंडवत ।
आपुलाले चित्त शुद्ध करा ॥१॥
हित ते करावे देवाचे चिंतन ।
करूनिया मन एकविध ॥२॥
तुका म्हणे लाभ होय ते व्यापार ।
करा काय फार शिकवावे ॥३॥
