रचना क्र. 60
अंधारुन हे किती येउ दे
श्री पेठेकाका · null
null
अंधारुन हे किती येउ दे,
मना, ध्यानि तू ठेव
खऱ्या संकटी वाट उजळण्या
अचुक उभा रे देव ! ॥धृ॥
प्रसंगात कधि बुद्धी हरते
गणगोताची शक्ती सरते
आर्तासाठी सदैव सावध
स्मरण जागते ठेव ... ॥१॥
साधन करिता कोरड पडते
शमादमांचे पाणि न पुरते
अंतर्यामी झरा तुझ्या रे
दीना जाणिव ठेव ... ॥२॥
