रचना क्र. 62
प्राणि जन्मासि हो आला
श्री गोंदवलेकर महाराज · null
null
प्राणि जन्मासि हो आला ।
आला तैसाचि हो गेला ॥धृ॥
माझे घर माझे धन ।
व्याकुळ झाला पंचप्राण ॥१॥
माझी माता माझी कांता ।
कोण आहे सांगा आता ॥२॥
स्त्रियापुत्रांचा हो लळा ।
कार्याकारण पडती गळा ॥३॥
इष्टमित्र अवघे जन ।
वाट पाहाती दुरून ॥४॥
आप्तसोयऱ्यांची गति ।
अवघे सुखाचे सांगाती ॥५॥
दास म्हणे सांगू किती ।
जन्मा आल्याची फजिती ॥६॥
