रचना क्र. 204
पाहता नयनांसी विश्राम
श्री पेठेकाका
पाहता नयनांसी विश्राम ।
माझा कोमळ प्रेमळ राम ॥धृ॥
अभिन्न सीता, लक्ष्मण भ्राता ।
घेउनि दासा श्री हनुमंता ।
प्रगटे मेघश्याम ॥१॥
कठोर किति तू कर्तव्यांसी ।
रक्षिसी परी शरणजनांसी ।
आदर्शांचे धाम ॥२॥
नि:स्वार्थाची तू परिसीमा ।
बाण उद्धरी, अतुल तव क्षमा ।
अपूर्व तारक नाम ॥३॥
मूल्यरक्षणा, सगुणनिर्गुणा ।
दीना बळ दे येण्या चरणा ।
प्रेम जडो निष्काम ॥४॥
