रचना क्र. 206
पोटापुरते काम
श्री तुकोबा
पोटापुरते काम ।
परी अगत्य तो राम ॥धृ॥
कारण ते हेचि करी ।
चित्ती पांडुरंग धरी ॥१॥
प्रारब्धी हेवा ।
जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका म्हणे बळ ।
बुद्धी वेचुनी सकळ ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 206
श्री तुकोबा
पोटापुरते काम ।
परी अगत्य तो राम ॥धृ॥
कारण ते हेचि करी ।
चित्ती पांडुरंग धरी ॥१॥
प्रारब्धी हेवा ।
जोडी देवाची ते सेवा ॥२॥
तुका म्हणे बळ ।
बुद्धी वेचुनी सकळ ॥३॥