रचना क्र. 207
आठवता श्रीराम
श्री समर्थ रामदास स्वामी
आठवता श्रीराम ॥
हृदयी, आठवता श्रीराम ॥धृ॥
आठव नाठव शोधुनि पाहता ।
मन झाले विश्राम ।१॥
फळले भाग्य बहु जन्मांचे ।
नामी जडले प्रेम ॥२॥
रामाविण अनु न दिसे काही ।
दासाचा हा नेम ॥३॥
© 2026 साधननंदादीप — डॉ. सुहास पेठे. सर्व हक्क राखीव.
रचना क्र. 207
श्री समर्थ रामदास स्वामी
आठवता श्रीराम ॥
हृदयी, आठवता श्रीराम ॥धृ॥
आठव नाठव शोधुनि पाहता ।
मन झाले विश्राम ।१॥
फळले भाग्य बहु जन्मांचे ।
नामी जडले प्रेम ॥२॥
रामाविण अनु न दिसे काही ।
दासाचा हा नेम ॥३॥