रचना क्र. 21
सोडू नये तुझे स्मरण
श्री नरहरी सोनार
सोडू नये तुझे स्मरण ।
ऐसे करी माझे मन ॥१॥
माझे चित्त तुझे पायी ।
राही ऐसे करी काही ॥२॥
मागणे ते हेचि मागो ।
आणिक न लागो छंदासी ॥३॥
काया वाचा आणि मन ।
समर्पिले तव चरणी ॥४॥
हाचि माझा निर्धार ।
म्हणे नरहरी सोनार ॥५॥
