रचना क्र. 22
मजपाशी नाही काही
श्री पेठेकाका
मजपाशी नाही काही
एक भाव आणिला पाही ॥धृ॥
किती एक झिजविती काया
किती एक तोडिती माया
तपपुण्ये तुज अर्पाया
किती आणिती गुरुराया ॥१॥
किती एक देती दाने
योग याग नाना साधने
किती एक सेवा करिती
किती सत्कर्मे तुज देती ॥२॥
किती एक थोर ज्ञानी
किती एक स्थिर निर्गुणी
धनमाने जगि किती थोर
तुज सर्वस्वे सादर ॥३॥
मज साधन ना ज्ञान
नसे लौकिकही नसे मान
तुजवीण दुजे मज नाही
एक भावे दीन पायी राही ॥४॥
