रचना क्र. 23
काही करुनि आता देवा
श्री पेठेकाका
काही करुनि आता देवा ।
तुमचे पायी ठाव द्यावा ॥धृ॥
किती जन्म आले गेले ।
कसे किती कोठे गेले ।
नकळे कुठले पुण्य म्हणुनि ।
तुमची भेटी जाली जीवा ॥१॥
दया नाही धर्म नाही ।
कर्म सारे स्वार्थापायी ।
येरझारा करिता करिता ।
खरा गवसला विसावा ॥२॥
तुमचे पायी समाधान ।
घडली भाग्ये ओळखण ।
दीन म्हणे गुरुदेवा ।
नच साहे अंतर जीवा ॥३॥
